गंगापूर, (प्रतिनिधी) : संभाजीनगर - अहिल्यानगर महामार्गावर ढोरेगावजवळील पेंडापूर फाटा येथे भरधाव स्कॉर्पिओचा टायर अचानक से, फुटल्याने वाहनाचा ताबा सुटून रस्त्यावर पलटी झाली. ही घटना सोमवारी (दि. १७) सकाळी सातच्या सुमारास घडली. या अपघातात वाहनातील चारजण किरकोळ जखमी झाले. स्थानिक न नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.
त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. छत्रपती र्गी संभाजीनगर येथून शिरूर, पुणेच्या दिशेने चारचाकी हे. (एमएच ४२ एएच ७८६७) स्कॉर्पिओ जात होती.
पेंडापूर फाट्याजवळ भरधाव असतानाच अचानक टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. काही क्षणांतच स्कॉर्पिओ रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात वाहनातील चौघांना किरकोळ दुखापत झाली असून, स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात पोहोचवले.
अपघातामुळे स्कॉर्पिओचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातावेळी स्कॉर्पिओच्या मागे अन्य कोणतेही वाहन नसल्याने मोठा अपघात टळला. दरम्यान, अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. वेळीच नागरिकांनी मदत कार्य करत जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींची नावे मात्र कळू शकली नाहीत.













